कृषी सेवक । २४ जानेवारी २०२३ । देशातील शेतकरी विविध प्रयोग करून त्यातून उत्पन्नाचे स्त्रोत्र निर्माण करीत असतात, असाच काहीसा प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे. सध्या सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन घेतलेले सोयाबीन घरीच ठेवले आहे. असे असताना यापासून कवडा गावाच्या शेतकऱ्याने नवीन उपक्रम केला आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर निर्मिती सुरू केली आहे. या प्रक्रिया उद्योगातून पनीरला 250 रुपये किलो तर गुलाब जामून ला 200 रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे या शेतकऱ्याला चांगले पैसे मिळाले आहेत. कवडा गावातील शेतकरी निरंजन कुटे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी गट शेती करता एक एकर शेतात सोयाबीनची लागवड केली आणि उत्पादनही भरघोस मिळाले.
त्यांना मात्र बाजार न मिळाल्याने त्यांनी सोयाबीन घरीच ठेवले. नंतर त्यांना पानी फाउंडेशनच्या वतीने सोयाबीन पासून पनीर आणि गुलाब जामुन निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी देखील यापासून गुलाबजामून आणि पनीरची घरीच निर्मिती सुरू करायचे ठरवले. त्यांनी सोयाबीन दळून त्यानंतर त्यापासून गुलाबजामून तयार केले. तसेच सोयाबीन रात्रभर पाण्यामध्ये भिजवून पनीर तयार केले. सध्या एक किलो सोयाबीन पासून 1200 ग्रॅम पनीर तयार केले जाते. हे पनीर 250 रुपये किलोप्रमाणे विक्री होते. यामुळे त्यांना यापासून चांगले पैसे मिळत आहेत. यामुळे या शेतकऱ्याला फायदा झाला आहे. अनेकदा शेतकरी बाजार नसल्याने नाराज होतात. मात्र काही शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून पैसे कमवत आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम