कृषी सेवक । १८ फेब्रुवारी २०२३। देशाचा कणा मानला जाणाऱ्या शेतकरीसाठी नेहमीच केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्या सोईसाठी वेगवेगळ्या योजना काढून शेतकरीला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासोबत शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदा व्हावा आणि त्याचे काम सोप्प व्हावे यासाठी दोन्ही सरकारे सातत्याने प्रयत्नशील असतात.
सध्या अनेक ठिकाणी शेती करताना पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो तसेच पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम शेतातील शेतमालावर होतो. त्यामुळे अनेक राज्य सरकारे सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहेत. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना ठिबक, स्प्रिंकलर आणि पोर्टेबल सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी अनुदानही दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकार शेतात शेततळं बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 1 लाखाहून जास्त पैशाचे अनुदान देत आहे.
काही दिवसांपूर्वीच राजस्थान सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये सरकारने शेततळ्यांच्या बांधकामाच्या खर्चावरील अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे, जेणेकरून लागवडीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देता येईल. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी ९० हजार रुपये अनुदान दिले जात होते, मात्र यंदापासून यासाठी १ लाख १० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेतातच शेततळे बांधावे आणि पाण्याची साठवणूक करावी असा हेतू राजस्थान सरकारचा आहे. परंतु यासाठी सरकारने काही नियम सुद्धा निश्चित केले आहेत. त्यानुसार, फॉर्म पौंडचा आकार हा कमीत कमी ४०० आणि जास्तीत जास्त १२०० घनमीटर असावा असे सांगण्यात आले आहे. तसेच सदर शेतकऱ्याकडे कमीत कमी ०.३ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तुम्हाला हे शेततळं बांधायचं असेल तर ते दाट लोकवस्तीपासून आणि रस्त्याच्या कडेला कमीत कमी 50 फूट अंतरावर बांधाव लागेल असा नियम आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम