कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. जर आपण त्यांच्या अंदाजाचा विचार केला तर त्यांच्यामते राज्यातील 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असून खरीप पिकाची काढणी करत असलेल्या शेतकऱ्यांना आणि रब्बी हंगामासाठी शेतीची पूर्वतयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे.पंजाबरावांच्या मते 3 नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असून काढलेला तसेच काढणीला आलेल्या शेतमाल सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे असे ते म्हणाले .
या कालावधीमध्ये जर अवकाळी पावसाचे आगमन झाले तर शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाच्या तयारीत आणि खरीप हंगामाच्या काढणीच्या कामांमध्ये अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागू शकतो तसेच काढलेला काही पिकांचे परत नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम