स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उद्या नाशिक येथे आंदोलन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी सकाळी ११ वाजता नाशिक जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर ऊस रोखणार आहे. स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी या आंदोलनास उपस्थित राहणार आहे…

दि. १५ ऑक्टोबरला २१ वी ऊस परिषद (जयशिंगपूर येथे झाली. यामध्ये एक रकमी एफ आर पी अधिक ३५० रुपये वाढीव भाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितला. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या वजनात काटेमारी केली जात आहे. या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आवाज उठवला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम