जिनिंगची भिंत फोडून चोरटयांनी कापूस , मका लांबविला

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | जिनिंगमधून चोरट्यांनी शनिवारी रात्री जिनिंगची बाजूची भिंत फोडून ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका मिळून लांबवल्याने सडे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. धरणगाव शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनींग आहे.

कपाशीला आठ हजार रुपये भाव असल्यामुळे तिची किंमत साधारण चार लाखांच्या घरात आहे तर मका 50 हजार रुपये असा साधारण साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी चार चाकी वाहनाच्या चाकांचे मार्क दिसल्याने चोरट्यांनी वाहनातून माल लांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे मजूर कामावर आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अमोल गुंजाळ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम