आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार मदत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I राज्यात २०२१ मध्ये १० हजार, ८८१ तर यंदा सप्टेंबरअखेर २१३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी मदतीची रक्कम जिल्हास्तरीय समिती तातडीने मार्गी लावेल, असे आश्वासन लेखी उत्तरात विधानसभेत कुणाल पाटील आणि अन्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला देण्यात आले.

 

राज्यात गेल्या वर्षी १० हजार ८८१ तर यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या काळात विदर्भात ११००, मराठवाड्यात ७५६, अमरावती विभागात ६१२, नागपूर विभागात १९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टी, सततची नापिकी, दुबार, तिबार पेरणी, वाढीव उत्पादन खर्च, खासगी सावकाराकडून होणारा छळ, कर्जावरील व्याज, बँकांकडून कर्ज नाकारणे, कर्जबाजारीपणा तसेच सरकारी आर्थिक मदतीचा अभाव यामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले.

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या एकूण २१३८ प्रकरणांत ११५९ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने मदतीकरिता पात्र, तर ५१२ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. ४३७ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत. ११४८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत दिली आहे. उर्वरित प्रकरणे तातडीने निकालात काढण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तातडीने कार्यवाही करेल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम