कृषी सेवक I २७ डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात सध्या तुरीचे दर टिकून आहेत. देशात यंदा तुरीचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळं निर्यातदार देशही कमी दरात तूर निर्यात करण्यास इच्छूक नाहीत. परिणामी देशातही तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र तरीही तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज कडधान्य प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम