कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. कृषी क्षेत्रातील आधुनिकतंत्रज्ञानाची प्रचार प्रसिद्धी होणे अत्यंत गरजेचे असते. कृषी विषयक दैनिक साप्ताहिक मासिकांमधून अभ्यासपूर्ण लेख कृषी विषयक योजनांची प्रचार प्रसिद्धी, शेतकऱ्यांच्या यशोगाथा इत्यादी बाबतची माहिती देणाऱ्या तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक यासारख्या समाज माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती / संस्था / वृत्तपत्र / साप्ताहिके / मासिक दूरचित्रवाहिन्या इत्यादींना कृषी विभागामार्फत महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांचे हस्ते वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे सन 2021 साठी कृषी विभागामार्फत नाशिक विभागातून वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पुरस्काराचे स्वरूप – रू.30,000/- रकमेचा धनादेश,स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार,
देण्यात येणारे पुरस्कार संख्या – 08 (प्रत्येक कृषी विभागातून 01 याप्रमाणे)
पुरस्कारासाठी चे निकष
5) प्रस्तावित व्यक्ती अथवा संस्था यांचा शासनाच्या कृषी विषयक धोरणांचा प्रचार व प्रसिद्धीमध्ये सक्रिय सहभाग असावा 6) संबंधित व्यक्ती शेतकरी असावा किंवा त्याच्या नावावर सातबारा असावा असे बंधन नाही मात्र शेतकरी असल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल. 7) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान तीन वर्ष असावे 8) प्रस्तावित व्यक्ती अथवा शेतकरी हा केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा.
प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे
1. केंद्र राज्य शासकीय निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसले बाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
2. मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला
3. शासनाच्या कृषी विषयक धोरणे, शेतकऱ्यांच्या यशोगाथा व कृषी विषयक आधुनिक
तंत्रज्ञान यांची प्रचार प्रसिद्धी केले बाबत तपशील प्रस्तावास जोडावे
तरी वरील प्रमाणे नाशिक विभागातील पात्र इच्छुक व्यक्ती अथवा संस्था यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम