कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दर वर्षी शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास कृषी विभागामार्फत महाराष्ट् राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांचे हस्ते वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे सन 2021 साठी कृषी विभागामार्फत नाशिक विभागातील शेतकऱ्यांकडून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्काराचे स्वरूप- रू.11000/- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार,
देण्यात येणारे पुरस्कार संख्या- 40 (यासाठी प्रति जिल्हा 01 याप्रमाणे सर्वसाधारण गटासाठी 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 01 याप्रमाणे 06 असे एकूण 40)
पुरस्कारासाठी चे निकष 1) शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीय सह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा. 2) प्रस्तावित शेतकरी हा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारा म्हणजेच यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत युनिट इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा.
3)प्रस्तावित शेतकरी केंद्र/ राज्य शासकीय / निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा
नसावा.
प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे
1) 7/12 व 8- अ चा उतारा
2) केंद्र राज्य शासकीय निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसले बाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
3) मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला
4) आदिवासी गटासाठी जातीचा दाखला
5) मिळालेले पुरस्कार व कृषी विषयक कार्य दर्शविणारे प्रमाणपत्रे
6) पीकस्पर्धा, कृषी प्रदर्शने, संशोधन संस्थांना भेटी इ. उपक्रमात सहभागी झाल्या बाबत तपशील
तरी वरील प्रमाणे नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर
करावा असे आवाहन श्री.मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम