महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा: हवामान विभागाने दिला येलो अलर्ट, जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा

महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागली असून हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील 32 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे.

अलिकडच्या काही दिवसांत राज्यातील काही भागांना पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता मान्सून तळ कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढे सरकला असून राज्यभर ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, आणि परभणी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 32 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह पावसाचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांतही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम