उस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | राज्यात उस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले असून यासाठी ते राज्यात ऊस परिषदेचे आयोजन करत आहेत. कारखानदारांवर टीका करत असून राहुरी येथील परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी यांनी विविध मागण्या केल्या आहेत. तसेच त्यांनी कारखानदारांवर आरोप केले आहेत.

ते म्हणाले, साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत, सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे. यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या 7 तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार आहे.

मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रूपये जास्त दर साखर कारखानदारांनी दिले पाहिजेत. तसेच यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देत हंगाम संपल्यानंतर 350 रूपये द्यावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम