गव्हाच्या दरातील तेजी कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | मागील महिनाभरात देशात गव्हाच्या दरात जवळपास २० टक्के वाढ झाली आहे. गहू आणि गहू पीठाच्या निर्यातीवर बंदी आणूनदेखील दर कमी झालेले नाहीत. सध्या स्थानिक बाजारपेठांत गव्हाची आवक रोडावली आहे. त्यामुळे दर तेजीत आहेत. अशा वेळी दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होतात. सरकार आपल्याकडील साठा बाजारात विक्रीसाठी खुला करत असते. यंदा मात्र बफर स्टॉक कमी असल्याने सरकारला खुल्या बाजारात गहू विकायला मर्यादा आहेत. गव्हाच्या किंमती वाढल्यामुळे मक्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. रब्बी हंगामातील नवा गहू बाजारात येईपर्यंत गव्हाच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम