रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ नोव्हेंबर २०२२ | कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे जिल्हयातील, पांझरा, मालनगांव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्प असे एकूण 12 मध्यम प्रकल्प, लघु 45 प्रकल्प, को.प. बंधारे 22व वळण बंधारे 30 असे एकूण 109 प्रकल्प तसेच नंदूरबार जिल्हयातील , रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे एकूण 3, लघु 33 प्रकल्प, को.प. बंधारे 6, वळण बंधारे 20 असे एकूण 62 तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिसुचित नदी, नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी केले आहे.

सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर, 2022 पर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही.

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षीत करण्यात आलेला आहे. आरक्षीत पाणी साठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागाव्दारे शेतीसाठी पाणी अर्ज स्विकारले जातील असेही कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम