कापूस भाव वाढणार ? जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

बातमी शेअर करा

दै. बातमीदार | ४ एप्रिल २०२४ | आपल्या कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकरीराजला आहे. परंतु, आतापर्यंत कापसाला हवा तसा भाव मिळत नाही आहे. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे तर काही बाजार समित्यांमध्ये कापसाला कमी भाव मिळत आहे. सध्या कापसाला ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, कापसाला आज फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळाला आहे. कापसाला येथे जास्तीत जास्त दर हा ८२०० प्रतिक्विंटल मिळाला तर कापसाचे आवक १५३ क्विंटल इतकी झाली आहे. तसेच देऊळगाव राजा या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा ८०८० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आज कापसाचे सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती झाली.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

paid add

टिप :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा कृषीसेवकशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम