याच शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | या योजनेस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना असे नाव देण्यात आले आहे
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्यासाठी सन 2017 18, सन 2018 19, आणि सन 2019 20, हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे या तीन आर्थिक वर्षात यापैकी कोणतेही दोन आर्थिक वर्षात पीक कर्ज घेऊन नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
प्रोत्साहनकर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये पन्नास हजार एक कमाल मर्यादित प्रोत्साहन पर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.
योजनेची अंमलबजावणी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल.
सदर योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे महा आयटी यांची पोर्टल साठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजनेच्या एकूण निधीच्या 0.25% इतकी कमाल रक्कम प्रकल्प अंमलबजावणी खर्च म्हणून पोर्टल द्वारे कर्ज खात्याची संस्करण करून लाभार्थ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्याच्या प्रक्रियेचा खर्च जाहिरात सेवा पुरवठादार संस्थेचा खर्च, प्रशासकीय खर्च, कंत्राटी मनुष्यबळ खर्च, आपले सरकार सेवा केंद्रांना आधार करावयाची रक्कम, संगणक, जिल्हा किंवा विभाग स्तरावर वाहने तसेच योजनेच्या इतर अनुषंगिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

योजनेचे निकष खालील प्रमाणे आहेत
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येणार आहेया योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येणार आहे
सन 2019 वर्षांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील तसेच एकादशी शेतकरी मुळे झाल्यानंतर त्याच्या वारसांनी कर्जाची परतफेड केल्या असल्यास भारत सुद्धा प्रोत्साहन पर योजनेच्या लाभास पात्र असणार आहेत.

या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेली शेतकरी
महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री राज्यमंत्री आजी-माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य.
राज्य सार्वजनिक उपक्रम व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतन 25000 पेक्षा जास्त आहे ते कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.शेती बाह्य उत्पनातून आयकर भरणारे शेतकरी निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांच्या मासिक निवृत्तीवेतन रुपये पंचवीस हजार पेक्षा जास्त आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम