पॉवर टिलर 50% अनुदान योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ | शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना आणत असते. यामध्ये कृषी यांत्रीकरण योजना हे एक योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना सर्व कृषी अवजारांच्या खरेदीसाठी सरकार अनुदान देते.

पॉवर टिलर अनुदान योजना.
पॉवर टिलर हे कृषी यंत्र सध्या मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होते. तुम्हाला जर पॉवर टिलर घ्यायचा असेल तर सरकार कृषी यांत्रीकरण योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य देते. यासाठी तुम्हाला महा डीबीटी या पोर्टल वर अर्ज करावा लागतो.

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी/ महिला शेतकरी
अर्ज कोठे करावा?
अनुदान :- बी.एच.पी. पेक्षा कमी 65000/- 50000/-
बी.एच.पी. पेक्षा जास्त 85000/- 70000/-
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पावर टिलर खरेदी करायचा असेल तर तुम्ही शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळू शकता यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. अर्ज करताना शेतकऱ्यांनी आपली प्रोफाईल बनवावे लागते यामध्ये शेतकऱ्याची सर्व माहिती शेतीची माहिती आणि पिकाची माहिती टाकावी लागते यानंतर कृषी यांत्रिकीकरण हा घटक निवडून पावर टिलर साठी अर्ज करता येतो. मित्रांनो तुम्ही नेट कॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवर अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे.

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड आणि सातबारा खाते उतारा ही कागदपत्रे आवश्यक असतात. तुम्ही अर्ज करताना ही सर्व कागदपत्रे सोबत असावीत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम