कृषि कर्ज मित्र योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १४ नोव्हेंबर २०२२ |  राज्य सरकारने शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून “कृषी कर्ज मित्र योजना” सुरू केली आहे.शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु, कर्ज प्रक्रियेचे अज्ञान कागदपत्र माहीत नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही.अशा इच्छूक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत सहायकाची म्हणजे मित्राची मदत/सहाय्य देणे गरजेचे आहे.गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे, अशी प्रकरणे तयार करणे आणि बँक मध्ये सादर करणे यासाठी कृषी कर्ज मित्र हे मदत करतील.

कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी.
कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण मंजूरीसाठी बँकेमध्ये सादर करेल.

सेवासुल्क दर

अ) अल्प मुदतीचे कर्ज :-

१. पहिल्यांदा पीक कर्ज घेणारा शेतकरी :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 150/-

ब) मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज :-

नविन कर्ज प्रकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 250/-
कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 200/-

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम