उडीद, मुगाच्या ‘या’ नव्या वाणाला मान्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २३ डिसेंबर २०२२ I शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच सुधारित आणि भरघोस उत्पन्न देणाऱ्या बियाणांची गरज असते. बाजारात नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाण येत आसतात. भरघोस उत्पन्न देण्याबरोबरच बियाण्यांपासून मिळणारे पीक चांगल्या दर्जाचे आणि चवदार असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. याचदृष्टीने महाराष्ट्रातील विविध संशोधन केंद्र नेहमीच प्रयत्नशील असतात.

अश्याच एका प्रयत्नातून जळगावातील ममुराबाद येथील महात्मा फुले संशोधन केंद्रात उडीद आणि मुगाचे नवे वाण प्रसारित करण्यात आले आहे. नुकतीच या दोन्ही वाणांना कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या वाणांचा शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपयोग करता येणार आहे. जळगावात प्रसारित झालेले हे दोन्ही वाण भरघोस उत्पादन तर देतीलच मात्र या वाणांची गुणवत्ता देखील वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

या नवीन वाणांना प्रसारित करण्याचे श्रेय कडधान्य पैदास विभागातील शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. राजपूत यांना जाते. ते ममुराबाद केंद्रातील तेलबिया संशोधन विभागातील काम करतात. त्यांनी उडिदाच्या वाणाला ‘फुले राजन’ हे नाव दिले आहे तर ‘फुले सुवर्ण’ या नावाने मुगाचे वाण प्रसारित केले आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment