देशात गव्हाची मागणी वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | देशात पाच दशकांपूर्वी गहू आणि तांदळाच्या मागणी मध्ये प्रचंड तफावत होती. १९७० मध्ये गव्हाची मागणी २२० लाख टन होती, तर तांदळाची ४१५ लाख टन. गव्हाची मागणी ही प्रामुख्यानं उत्तर भारतातून जास्त असते तर तांदळाची पूर्व आणि दक्षिण भारतातून. जागतिकीकरणानंतर भारतीयांची जीवनशैली खूपच बदलली. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी गव्हाचा पेरा वाढवला. सुरुवातीच्या काही महिन्यात पीकही चांगलं होतं. त्यामुळे विक्रमी उत्पादनाच्या आशेवर जगाची भूक भागवण्याचा गप्पा केंद्र सरकार करू लागलं होतं. मात्र दाणे पक्वतेच्या वेळी तापमान वाढल्यानं उत्पादनात दणदणीत घट झाली. गेल्या वर्षी गव्हाचं उत्पादन १०९६ लाख टन होतं. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या वर्षी १०६८ लाख टन उत्पादन झालं.पुढील वर्षी मात्र उत्पादनात घट झाली तर आपल्याला चक्क गव्हाची आयात करावी लागेल. यापूर्वी २०१७ मध्ये ५३ लाख टन गव्हाची आयात करावी लागली होती. पण तेव्हा अनेक देशांकडं गव्हाचं अतिरिक्त उत्पादन होतं. आता तशी स्थिती नाही. दुसरं म्हणजे गहू उत्पादनात जगात आपला दुसरा क्रमांक लागतो. बऱ्याचदा आपण निर्यातही करत असतो. पण पुढच्या वर्षी आपल्याला ९० किंवा १०० लाख टन गव्हाची आयात करावी लागली तर जागतिक बाजारात किमती मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यामुळे रशिया, युक्रेन आणि इतर देशांनी अतिरिक्त गहू पिकवला तरच भारताची सोय लागणार आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment