डाळींबाला १२ हजार पर्यंत भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I राज्यातील बाजारात डाळींबाची आवक कमी झाली. मात्र दराला आधार मिळालेला दिसत नाही. डाळींबाचे दर सरासरी ६ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. यंदा बदलत्या वातावरणामुळे डाळींबाची गुणवत्ता कमी झाली होती.

 

त्यामुळं दर्जेदार फळांची उपलब्धता घटली. सध्या दर्जेदार फळांना प्रतिकिलो १२० ते २०० रुपये दर मिळतोय. मात्र या फळांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळं डाळींबाचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज डाळींब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment