ओलाव्यामुळे सोयाबीनचे दर स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | बाजारात सोयाबीन दर सध्या स्थिर दिसत असून सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने भाव सोयाबीनचा दर्जा पाहून मिळत आहे. . त्यामुळे ओलावा आणि गुणवत्तेप्रमाणं सोयाबीनला बाजारात दर मिळत असून . जास्त ओलावा आणि काडी-कचरा असलेल्या सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांपासून ४ हजार ६०० रुपये दर मिळत आहे. तर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचे व्यवहार प्रतिक्विंटल ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत. सोयाबीनला महिनाभर ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment