देशात सध्या तुरीची टंचाई ;दरातील तेजी कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | देशात सध्या तुरीची टंचाईजाणवत असून तुरीच्या दरात तेजी आली आहे. . सध्या देशात तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र सध्या शेतकऱ्यांकडे तूर नाही. नवी तूर डिसेंबरपासून बाजारात येण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत आयात आणि उपलब्ध साठ्यावरच गरज भागवावी लागेल. त्यातच यंदा तुरीचं उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment