४८ तासांत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता; उष्णतेचा यलो अलर्टही जारी!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २६ एप्रिल २०२४ । महाराष्ट्रात एकीकडे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. तर दुसरीकडे मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत जोरदार पावासाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीजात आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती तर तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मोठी बातमी..! इथेनॉल निर्मितीस परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय!

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दि .२६ एप्रिल २०२४ रोजी सोलापूर, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पावसाची शक्यता आहे. तर २७ एप्रिलला जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. २६ आणि २७ एप्रिलला धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

राज्यातील २१ साखर कारखान्यांना कर्जाची हमी; २१ पैकी १५ कारखाने राजकीय नेत्यांचे!

मागील २४ तासांमध्ये राज्यात धुळे (४२), मालेगाव (४२), जळगाव (४१.७), सोलापूर (४१.२), वाशीम (४०.६), ब्रह्मपुरी (४०.५), अकोला (४०.४), बीड (४०.१), वर्धा (४०.१), अमरावती (४०) या ठिकाणांवरील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. तर अशातच आता पुढील दोन दिवस मुंबई, ठाणेसह कोकणासाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली असून, उष्णतेचा यलो अलर्टही जारी केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम