टोमॅटो मार्केट: स्थानिक टोमॅटोचे सर्वाधिक दर, आज कोणत्या बाजारात किती दर मिळाले, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा

आज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये एकूण 18,307 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. यामध्ये वैशाली टोमॅटोची आवक 900 क्विंटल इतकी होती. आज टोमॅटोला सरासरी 1100 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. स्थानिक टोमॅटोला इतर टोमॅटोच्या तुलनेत चांगला भाव मिळत आहे.

तूर बाजार: तूरीचा भाव स्थिर! आज राज्यात ६ हजार ४२४ क्विंटलची आवक, मिळतोय असा भाव…

आज 25 मे 2024 रोजी, पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला सरासरी 1000 रुपयांपासून ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र अहमदनगर, चंद्रपूर – गंजवड, श्रीरामपूर बाजार समित्यांमध्ये हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळाला. कळमेश्वर बाजार समितीत हायब्रीड टोमॅटोला 1320 रुपयांचा दर मिळाला. स्थानिक टोमॅटोला सरासरी 1000 रुपये ते 3500 रुपये असा उच्चतम दर मिळाला. यात अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केटला 1600 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, पेन बाजारात 2200 रुपये दर मिळाला. मंगळवेढा बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला.

रेमल चक्रीवादळ: दुष्काळाचे खापर चक्रीवादळावर फुटण्याची शक्यता

आज वैशाली टोमॅटोला सरासरी 1000 रुपयांपासून ते 1875 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत सरासरी 1500 रुपये, जळगाव बाजार समितीत 1600 रुपये, नागपूर बाजार समितीत 1875 रुपये, कराड निफाड बाजार समितीत 1000 रुपये, भुसावळ बाजार समितीत 2000 रुपये दर मिळाला.

आजचे टोमॅटो बाजारभाव असे आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम