रेमल चक्रीवादळ: दुष्काळाचे खापर चक्रीवादळावर फुटण्याची शक्यता
शेतकऱ्यांना हवामान तंत्रज्ञान सजग करणारे सदर (रेमल चक्रीवादळाचा प्रभाव)
बंगालच्या उपसागरात महाराष्ट्रापासून १,५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर तयार होत असलेल्या ‘रेमल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच अफवा पसरवून इतरांना घाबरवू नका. दुष्काळ आणि मान्सून पॅटर्न बदलल्यानंतर गायब होणारा पाऊस याचे खापर ‘रेमल’वर फोडले जाण्याची शक्यता आहे.
तूर बाजार: तूरीचा भाव स्थिर! आज राज्यात ६ हजार ४२४ क्विंटलची आवक, मिळतोय असा भाव…
१०६ टक्के मान्सून बरसणार या गृहितकावर विसंबून न राहता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता येणाऱ्या परिस्थितीत पाणी व पैसा वाचवत धैर्याने तोंड देणे आवश्यक आहे. अन्नसुरक्षा आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी धोरणात्मक कृतीकार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.
‘रेमल’ नावाची कथा
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘रेमल’ हे नाव ओमानने सुचवले आहे, ज्याचा अरबी भाषेत अर्थ ‘वाळू’ असा होतो.
येथे होईल पाऊस
‘रेमल’ चक्रीवादळामुळे वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल. विजांच्या गडगडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, त्यामुळे मच्छीमारांना बंगालच्या उपसागरात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
‘रेमल’ नंतर ‘आसना’
‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी २६ मे २०२४ रात्री किंवा सोमवारी २७ मे २०२४ नंतर बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर धडकू शकेल. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर ‘आसना’, ‘दाना’, ‘फेंगल’, ‘शक्ति’, ‘महिना’, ‘सेयर’, ‘दितवाह’ अशी पुढील सात चक्रीवादळांची नावे आहेत. ही सर्व चक्रीवादळे साधारणतः जून २०२६ पर्यंत पहायला मिळतील.
मॉन्सून अपडेट: देशात मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण; पुढील दोन दिवसात कुठे जाणार?
चक्रीवादळ निर्मिती ही संथ नैसर्गिक घटना
चक्रीवादळ निर्मिती ही संथ नैसर्गिक घटना आहे. नॅशनल हरिकेन सेंटरनुसार, १९९४ मधील ‘जॉन’ नावाच्या चक्रीवादळाने तयार होऊन नष्ट होण्यासाठी ३१ दिवसांचा कालावधी घेतला होता, तर २०१३ मधील ‘हैयान’ चक्रीवादळाने १३.५ दिवसांचा कालावधी घेतला होता.
मान्सूनवर परिणाम नाही!
मान्सून पॅटर्न बदलला आहे, पण मान्सूनवर चक्रीवादळांचा काहीही परिणाम होत नाही. उलट मान्सून संपला किंवा सुरू होण्यापूर्वी वातावरणातील अस्थिरतेमुळे दरवर्षी चक्रीवादळे निर्माण होतात. वादळे ही एकंदर मान्सून सिस्टिमचाच भाग असतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मान्सून ही मोठी एटमॉस्फिअरीक सिस्टिम आहे, जी प्रचंड ऊर्जा घेत तयार होते. चक्रीवादळे तुलनेने लहान वायू भोवरे आहेत, जी अत्यंत कमी व नगण्य ऊर्जा घेतात.
Soybean Sowing: यंदा सोयाबीन पेरावे का? बियाण्याच्या किंमती वाढल्या
चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला: ३२ टक्के वाढ
चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला असून, भारतीय उपखंडात अस्थिरता वाढल्यामुळे चक्रीवादळे ३२ टक्के वाढली आहेत. २०१० ते २०१९ या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे धडकली. २०१५ ते २०१९ या पाच वर्षांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती ३२ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांची संख्या अकरा टक्क्यांनी वाढली आहे. १८९१-२००० सालाच्या कालावधीत ३०८ उष्णकटिबंधीय चक्रीवादळांनी पूर्व किनारपट्टी ओलांडली, त्यातील १०३ तीव्र होती
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम