महाराष्ट्र हवामान अंदाज: अवकाळी पाऊस, उष्णता, मान्सून, चक्रीवादळाची स्थिती, वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये हवामान कसे असेल, हे जाणून घेऊया
मान्सून प्रगतीपथावर असून आज बंगालच्या उपसागराचे अर्धे क्षेत्र आणि श्रीलंकेचा भाग व्यापला आहे. मान्सून 31 मे रोजी केरळात, 10 जून रोजी मुंबई आणि कोकणात, आणि 15 जून रोजी कोकणातून सह्याद्री ओलांडून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, आणि विदर्भात पोहोचण्याची शक्यता आहे.
मान्सूनची बंगाल शाखा लवकर सक्रिय होऊ शकते. त्यामुळे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये मान्सून लवकर येऊ शकतो. हे सर्व जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या हालचालींवर अवलंबून आहे.
मान्सूनपूर्व पाऊस कधी येईल?
सध्याच्या उष्णतेच्या लाटांमुळे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कधीही कोसळू शकतात, ज्याचा शेतमालाच्या कामासाठी उपयोग होऊ शकतो.
बंगाल उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होईल?
बंगाल उपसागरात तयार झालेले ‘रेमल’ नावाचे चक्रीवादळ 26 मे रोजी मध्यरात्री बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. याचा महाराष्ट्रातील उष्णतेच्या लाटेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
आशियाई देशांनी दिलेल्या नावांनुसार ओमानने सुचवलेले ‘रेमल’ नाव या चक्रीवादळाला दिले आहे. अरबी भाषेत ‘रेमल’ चा अर्थ ‘वाळू’ आहे.
विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि उष्णतेची स्थिती किती दिवस राहील?
विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 26 मे पासून 30 मे पर्यंत अवकाळी पाऊस कमी होऊन उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
Soybean Sowing: यंदा सोयाबीन पेरावे का? बियाण्याच्या किंमती वाढल्या
कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि उष्णतेची स्थिती किती दिवस राहील?
मुंबईसह कोकण, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये 1 जूनपर्यंत अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही का जाणवत आहे?
कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान 40 ते 44 डिग्री से. आहे, तर पहाटेचे किमान तापमान 28 ते 30 डिग्री से. आहे. सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने जास्त तापमान असल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही जाणवेल. मुंबईसह कोकणात कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 26 डिग्री से. असून, ते सरासरीपेक्षा 3 ते 4 डिग्रीने जास्त आहे, त्यामुळे तेथेही रात्रीचा उकाडा जाणवेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम