सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर संकट : शेतमालाचे भाव पडले

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २५ ऑक्टोबर २०२३

राज्यभरात नुकतेच दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाला कृषी संस्कृतीमध्ये खूप महत्वाचा दिवस म्हटला जातो. या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या घरी खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू होऊन सुगी (शेतमाल) येण्यास सुरुवात होते. तर दिवाळीला शेतमाल घरात पडून सर्व कामे झालेली असतात. त्यामुळे शेतकरी खुश होऊन आगदी आंनदी होऊन दसरा-दिवाळी साजरी करत असतात. पण या चालू वर्षी दुष्काळाने खूप मोठा तडाखा दिल्याने सुगी घरी येणे कमी झाले आहे. त्यामुळे हे दसरा-दिवाळी सण शेतकरी-शेतमजुरांना आनंदात जाणार नाही.

उशिरा पाऊस झाल्याने पेरणी उशिरा झाली. त्यानंतर ऑगस्ट महिनाभर खंड पडला. परिणामी पिके कोवळी असताना पाऊसमुळे जळाली. तर काही पिकांना फुले लागणे चालू होते, ती पहिले वाळून गाळली. शेंगा लागलेल्या शेंगांची पापड्या झाल्या. त्यामुळे दाणे बारीक जन्माला येऊन शेतमाल पदरात पडणे खूपच कमी झाले आहे. एकंदर या चालू खरीप हंगामात पाऊस नसल्याने शेतमालाचे नुकसान झाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत 25 ते 30 टक्के पिके जगवून शेतमाल पदरात घेण्याचे प्रयत्न केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम