महागाईचा भडका; दुधाला मिळतोय २१० रूपये प्रति लिटरचा भाव!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ९ एप्रिल २०२४ । व्याख्येनुसार, दूध हे पौष्टिक-समृद्ध द्रव आहे जे मादी सस्तन प्राण्यांना त्यांच्या पिलांना खायला घालण्यासाठी तयार करतात. हे महत्त्वपूर्ण पोषक आणि प्रथिनांचा एक उत्तम स्रोत भरलेले आहे. दुधाचे दूध पिणे आपल्या हाडांसाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील चांगले आहे. हजारो वर्षांपासून जगभरात दुधाचा आनंद घेतला जात आहे. गायी, मेंढ्या आणि शेळ्यांमधून सर्वाधिक सेवन केले जाणारे प्रकार येतात. तसेच आपण सर्व गाईचे दूध जास्त प्रमाणात पीत असतो आणि ते शरीरासाठी चांगले देखील असते.

‘या’ दिवशी मिळणार कापूस बियाणे; त्या पूर्वी विक्री केल्यास होणार कारवाई!

महाराष्ट्रात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे दूध उत्पादनाचा खर्च वाढलेला असताना अलीकडे दुधाला २५ ते २७ रुपये प्रति लिटरचा दर मिळत आहे. मात्र, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात सध्या याउलट परिस्थिती असून, त्या ठिकाणी एक लिटर दुधासाठी नागरिकांना २१० रूपये मोजावे लागत आहे. नुकतीच कराची येथील आयुक्तांनी पाकिस्तानातील डेअरी फार्मर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात दुधाच्या दरात १० रुपयांनी वाढ करण्यात आली असून, सध्या पाकिस्तानात एक लिटर दुधाची किंमत २१० रूपये इतकी झाली आहे.

पाकिस्तामध्ये फक्त दूधच नाही, तर मैदा, डाळी, तांदूळ देखील महागले आहेत. पाकिस्तानमध्ये एक किलो तांदूळ २०० ते ४५० रुपये किलो दराने विकला जात आहे. तर डाळ १५० ते ४०० रुपये किलो दराने विकली जात आहे. देशातील महागाई कमी होत असताना पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे एका नामांकित वृत्तसमूहाने म्हटले आहे.

paid add

सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्र; जाणून घ्या काय आहे ‘या’ यंत्राचे फायदे?

मागील वर्षी मे महिन्यामध्ये महागाईने पाकिस्तानमध्ये उच्चांक गाठला होता. तिथे महागाईचा दर ३८%च्या पुढे गेला होता. तो आशियातील सर्वाधिक दर होता. पाकिस्तानात गेल्या वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झालेली पाहिली तर सरकारी आकडेवारीनुसार शहरी भागात टोमॅटोचे भाव १८८ %, कांद्याचे ८४ %, मसाल्याच्या ४९ %, साखरेच्या किमतीत ३७ टक्क्यांनी तर मटनाच्या किमतीत २२%नी वाढ झाली असल्याचेही या वृत्तसमूहाने म्हटले आहे.

तसेच, पाकिस्तानी लोकांसाठी लवकरच प्रति लिटर दुधात ५० पीकेआर वाढ होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादनाचा वाढता खर्च, जनावरांच्या वाढत्या किमती आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे दुधाच्या दरात अचानक वाढ दिसून आली आहे. असे पाकिस्तानातील डेअरी फार्मर्सचे अध्यक्ष मुबाशेर कादिर अब्बासी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम