सरकारचा शेतकऱ्यांना पुन्हा धक्का; शेतकऱ्यांच्या वीजबिलात वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ एप्रिल २०२४ | राज्यात १ एप्रिल २०२४ पासून नवे वीज दर लागू करण्यात आले असून सर्वसामान्य ग्राहक, उद्योजक यांच्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खिशालाही मोठा आर्थिक भार बसणार आहे. शेतकऱ्यांना ५ हॉर्सपॉवरपर्यंत पंपासाठी आता ५६३ रुपये स्थिर आकार द्यावा लागेल. पूर्वी हे बिल ४६६ रुपये इतके होते.

राज्य सरकारकडून १० % दरवाढ सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात ग्राहकांवर सरासरी १५ ते ४० टक्के अधिक भार पडेल, असा वीज तज्ञ प्रताप होगाडे यांचा दावा आहे. महावितरणने स्थिर आकार आणि इंधन अधिभार दरात ही वाढ केली आहे. घरगुती सिंगल फेजसाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे. आता ११२८ रुपये लागतील. थ्री फेजसाठी पूर्वीच्या ३८५ ऐवजी ४२५ रुपये, वाणिज्यिक ग्राहकांना ४७० ऐवजी ५१७ रुपये लागतील. सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईटस् आणि लघु उद्योजकांच्या वीज बिलातही वाढ करण्यात आली आहे.

paid add

नवीन आर्थिक वर्षात आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी महावितरण कंपनीने वीज ग्राहकांवरच हा आर्थिक भार टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला आहे. सदर घटनेमुळे घरगुती वीजेचा दर १०० युनिटपर्यंत २४ % तर ५०० युनिटच्या वर ३४ % वाढणार आहे. व्यापारी वापरात १५ ते २० % वाढ होईल. शेतीसाठी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. शेतकऱ्यांना यापुढे ३८ ते ४८ टक्के वाढीव दराने बिले द्यावी लागतील, असे होगाडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम