महाराष्ट्र हवामान अपडेट: चक्राकार वाऱ्यांची स्थिती, मोसमी पावसाची आतुरता

हवामान अंदाज: कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, कुठे उष्णतेची लाट? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ मे २०२४ | महाराष्ट्रातील नागरिकांना उन्हाच्या तापापासून मुक्तता मिळण्यासाठी मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे. इशान्य अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रीय होत असून लवकरच राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, नैऋत्य मोसमी वारे सध्या बंगालच्या उपसागरावर सक्रीय आहेत आणि येत्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा केरळ आणि आंध्र प्रदेशला लागून परिसरात प्रवेश करणार आहे.

यशोगाथा : आठवी पास शेतकऱ्याची यशस्वी आंबा शेती; वर्षाला कमावतो लाखो रुपये!

मान्सून आगमनाआधी महाराष्ट्रातील नागरिकांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील तापमान वाढत असून अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

कुठे कोणता इशारा?

अवकाळी पावसाचा अलर्ट: बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग

केळी, पपई पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम: खान्देशात रोपांची टंचाई

उष्णतेची लाट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदूरबार, जळगाव, अकोला

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम