यशोगाथा : आठवी पास शेतकऱ्याची यशस्वी आंबा शेती; वर्षाला कमावतो लाखो रुपये!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ मे २०२४ | अलीकडच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कथा पाहणार आहोत ज्यांनी आपल्या आंबा शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी आपल्या आंबा बागेत विविध जातींची लागवड केली असून त्यांना वार्षिक ८ ते ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे ते केवळ आठवी पास असून त्यांच्या यशस्वी आंबा शेतीची सर्वदूर चर्चा होत आहे.

केळी, पपई पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम: खान्देशात रोपांची टंचाई

वर्षानुवर्षे नफा मिळवणारी आंबा शेती

नवीन कुमार राय हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते केवळ आठवी पास असून त्यांनी आपल्या शेतीमध्ये विविध जातींच्या आंब्याची लागवड केली आहे. यातून त्यांना वार्षिक ८ ते ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. नवीन कुमार राय यांनी ५ वर्षांपूर्वी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आंब्याची झाडे लावली होती. आता त्या झाडांना चांगली फळे येऊ लागली आहेत. त्यामुळे आंबा लागवडीवर एकदाच खर्च करून त्यांना वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा नफा मिळत राहणार आहे.

नियोजन कसे केले?

शेतकरी नवीन कुमार राय सांगतात की आंबा बागेची जास्त काळजी घेण्याची गरज नसते. फक्त वेळोवेळी खुरपणी आणि गरजेनुसार पाणी द्यावे लागते. ते कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरत नाहीत. त्यामुळे आंब्याचे फळ मोठे होते आणि फळातील गोडवा कायम राहतो. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

जमुन मार्केटला लहरी हवामानाचा फटका, दर हापूससारखेच

मिळतोय भरघोस नफा

नवीन कुमार राय सांगतात की आपल्या बागेत आंब्याच्या विविध जातींची लागवड केली आहे. दशहरी आंबा लोकांना खूप आवडतो. आम्रपाली आंबा त्याच्या गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे आणि बाजारात त्याची किंमत १५० ते २०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचते. यामुळे त्यांना चांगला नफा मिळत आहे. नवीन कुमार राय यांनी आंबा लागवडीची तंत्रज्ञान सापडली आहे आणि सध्या ते लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम