यंदा आंब्याचे उत्पादन १४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता !

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ एप्रिल २०२४ | भारतातील एकूण आंब्याचे उत्पादन यावर्षी सुमारे १४ टक्क्यांनी वाढून २४ दशलक्ष टनापर्यंत पोहोचू शकते, असे ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी दामोदरन यांनी सांगितले.

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतकर्‍यांनी फळगळती कमी करण्यासाठी सिंचनाची योग्य काळजी घेतली तर उष्णतेची लाट आंब्याच्या उत्पादनावर लक्षणीय परिणाम करणार नाही.

आपल्या ताज्या उन्हाळी हवामान अंदाजात भारताच्या हवामानशास्त्र विभागाने (IMD) उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला आहे जो नेहमीच्या दोन ते चार दिवसांऐवजी १०-२० दिवसांपर्यंत टिकू शकतो.

दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात सामान्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

“आंब्याची फुले येण्याची प्रक्रिया ही फळे येण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक आहे. हवामानामुळे आंब्याची फुलधारणा अवस्था जवळजवळ संपली आहेत. परागी भवन सामान्य आहे आणि फळ धारणा सुरू झाली आहे. सामान्य उष्णतेच्या लाटा उत्पादनावर परिणाम करू शकत नाहीत मात्र अप्रत्यक्षपणे पिकाला मदत करतात, असे दामोदरन यांनी म्हटले.

यावर्षी आंबा उत्पादन वाढीची शक्यता सध्या चांगली आहे. २०२२-२३ मध्ये २१ दशलक्ष टनांच्या तुलनेत २०२३-२४ पीक वर्षात (जुलै-जून) एकूण उत्पादन २४ दशलक्ष टनांपर्यंत वाढू शकते, असे देखील ते म्हटले आहेत.

paid add

देशाच्या एकूण उत्पादनात ५० टक्के योगदान देणार्‍या दक्षिण भारतात आंब्याचे उत्पादन बंपर असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी, हवामानाच्या विकृतीमुळे दक्षिणेकडील राज्यांना १५ टक्के नुकसान सहन करावे लागले. परंतु, यंदा परिस्थिती चांगली आहे, असे देखील ते म्हटले.

आंबा फुलांच्या आणि फळांच्या स्थापनेमध्ये हवामानाची भूमिका असते. तसेच, सामान्य उष्णतेची लाट असल्यास, शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगणे खूपच आवश्यक असून सौम्य सिंचन सुनिश्चित करून जमिनीतील ओलावा राखून अजैविक ताण दूर करणे आती आवश्यक आहे, ज्यामुळे फळांची गळती कमी होते.

आक्रमक कीटकांच्या आक्रमणाबाबत, विशेषतः उत्तर मैदानी प्रदेशातील आंबा पिकवणाऱ्या भागात थ्रिप्स किडींबाबत सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. अनेक आंब्यांच्या बागांमध्ये थ्रिप्सची संख्या अनेक पटींनी वाढली असून अन्नाच्या शोधात, थ्रिप्स कीटक फुलांच्या भागातून नव्याने तयार झालेल्या फळांमध्ये स्थलांतरित होतील. पीक वाचवण्यासाठी शेतकरी ताबडतोब कीटकनाशक विशेषत: इमिडाक्लोप्रिड ४ मिलिलिटर (मिली) प्रति लिटर पाण्यात किंवा थायामेथॅक्सम ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात.

शेतकर्‍यांनी वरील कीटकनाशकासह लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.५ मिली प्रति लिटर वापरून सेमी लूपर कीटकांची काळजी घ्यावी, असे देखील ते म्हणाले.

तसेच, जर शेतकर्‍यांनी पावडरी मिल्ड्यू, रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकॅनॅझोल २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली नसेल, तर त्यांनी ही फवारणी वरील फवारणीत मिसळून करावी.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम