कांदा फुलविणार शेतकरीच्या चेहऱ्यावर हास्य !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ११ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही महिन्यांपासून देशात कांद्याचा दर स्थिर असून सध्या या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे कांदा आता शेतकरीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणार आहे.

सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या किंमतीत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कांद्याचे दर हे 55 ते 60 रुपये प्रति किलोवर जातील, अी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. देशात सध्या कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, बराचसा कांदा खराब झाला आहे. त्यामुळं चांगल्या प्रतीचा कांदा महाग होण्याची शक्यता आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये कांद्याचे घाऊक भाव 5 रुपये प्रति किलो ते 24 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 25 ते 35 रुपये प्रति किलो वर गेले आहेत.

paid add

बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक भागात झालेल्या पावसाचाही पिकावर परिणाम झाला आहे. तसेच काही भागात साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब देखील झाला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा आता हळूहळू कमी होत आहे. साठा करुन ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम