नगरच्या ज्वारी पिकाचे क्षेत्र यंदा घटणार

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ | राज्यात प्रसिद्ध नगरच्या ज्वारी पिकाचे क्षेत्र यंदा जादाच्या पावसाने घटणार आहे. यामुळे यंदा ज्वारीची भाकर दुर्मिळ होणार अआहे असे चित्र दिसत आहे.
जिह्यात दरवर्षी ज्वारीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 67 हजार हेक्टर असताना आतापर्यंत 3 हजार हेक्टरच्या जवळपास ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे.

paid add

राज्याच्या कृषीच्या नकाशावर नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परतीच्या दमदार पावसावर जिह्यातील शेतीचे भवितव्य अवलंबून असते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत नगर जिह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पडणाऱया मान्सूनच्या पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. यंदा तर पावसाने कहर केला असून, सरासरीपेक्षा 135 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात 15 ऑगस्टनंतर तर काही भागात गोकुळ अष्टमीनंतर ज्वारीच्या पेरण्या सुरू होत्या. मात्र, यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात जोरदार पाऊस कोसळत आहे.
यामुळे शेतकऱयांना ज्वारी पिकाची पेरणी करणे अवघड झाले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम