साखर हंगामात ६० लाख मेट्रिक टनापर्यंत साखर निर्यात करण्यास परवानगी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | देशातील साखरेची किंमत स्थिर ठेवणे आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यांचा समतोल राखण्यासाठी, ऊस उत्पादनाच्या सुरुवातीच्या अंदाजांवर आधारित 2022-23 च्या साखर हंगामात 60 लाख मेट्रिक टनापर्यंत साखर निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. डीजीएफटी म्हणजेच विदेशी व्यापार संचालनालयाने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ‘प्रतिबंधित’ श्रेणीत असलेल्या साखर निर्यातीचा समावेश वाढवण्यासंबंधीची अधिसूचना याआधीच जारी केली आहे.

केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत घरगुती वापरासाठी सुमारे 275 लाख मेट्रिक टन(MLT) साखर, इथेनॉल उत्पादनाकडे वळविण्यासाठी सुमारे 50 एमएलटी साखर आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत जवळपास 60 एमएलटी साखर उपलब्ध असली पाहिजे, याला प्राधान्य दिले आहे. देशातील साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्यापैकी शिल्लक साखरेला निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल.

साखर हंगाम 2022-23 च्या सुरूवातीला ऊस उत्पादनाचे प्राथमिक अंदाज उपलब्ध असल्याने 60 एलएमटी साखर निर्यात करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील ऊस उत्पादनाचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल आणि ताज्या उपलब्ध अंदाजांच्याआधारे साखर निर्यातीच्या प्रमाणाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम