शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ‘या’ दिवशी मिळणार १५ वा हप्ते

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १० नोव्हेबर २०२३

देशभरात दिवाळीचा उत्साह सुरु असतांना अनेक शेतकऱ्यांची दिवाळी मात्र पावसाअभावी पिक न आल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने यंदाची दिवाळी शेतकऱ्यांना गोड करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचे 14 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहे. यानंतर शेतकरी आता या योजनेतील पंधराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. अशात या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पीएम किसान योजनेतील पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेतील 15 व्या हप्त्याची शेतकरी वाट बघत आहे. अशात 15 नोव्हेंबर 2023 रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे 15 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांना 15 वा हप्ता मिळेल. प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेतील पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी आधार कार्ड लिंक आणि जमिनीची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहे. त्यांना या योजनेतील पंधरावा हप्ता मिळेल. दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान योजना सुरू केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम