‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

बातमी शेअर करा

बातमीदार | १८ ऑगस्ट २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झाले असून शेतात मोठे नुकसान होत आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पाऊस कमी झाल्यामुळे मराठवाड्यात खरीपाच उत्पादन ३५ ते ४० घटण्याची शक्यता आहे.

तर येत्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला नाही तर ३५ लाख हेक्टरवरील पिके वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम पावसाअभावी धोक्यात आला आहे. सध्या लागण केलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. आणि त्यातच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची अधिक चिंता वाढली आहे.

paid add

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पिकांची पेरणी केली आहे. बऱ्यापैकी क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या १५ दिवसाहून अधिक काळ झालं राज्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरलेली पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हवामान खात्याचा अंदाज बरोबर येतो का हे पाहणं आता महत्त्वाच आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम