‘या’ फळाच्या शेती करून शेतकरी कमवितो लाखो रुपये !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १९ ऑगस्ट २०२३ | देशातील अनेक राज्यातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीकडे शेतकरी वळत असतांना दिसून येत आहे. अनेक शेतकरी फळबाग लावल्यामुळे आनंदी आहेत. त्यांचे उत्पन्न लाखो रुपयांत होत आहे. आता आपण राजस्थानच्या अशा शेतकऱ्याविषयी पाहणार आहोत ज्याने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती केली.

यातून ते दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांची कमाई करत आहेत. या डाळिंबाला विदेशातही मागणी आहे. शेतकरी श्रवण सिंह यांच्या बागेत डाळिंबाचे पाच हजार झाडं आहेत. दुसरे पाच हजार झाडं त्यांनी त्यांच्या भावाच्या फार्महाऊसवर लावले. याशिवाय तायवाई पिंक पेरू, केसर आंब्याची जातीही शेतात लावली. सेंद्रीय पद्धतीने ते सर्व शेती करतात. सिरोही जिल्ह्यातील शेतकरी श्रवण सिंह शिकलेले शेतकरी आहेत. ते पदवीधर आहेत. सुरुवातीला ते रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय करत होते. परंतु, व्यवसायात त्यांचे मन लागत नव्हते. श्रवण सिंह यांनी फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. आधुनिक पद्धतीने लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू आणि काकडीची शेती त्यांनी केली. यातून त्यांना वर्षाला ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम