‘या’ आहेत सोयाबीनचे चार प्रमुख वाण; शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २८ एप्रिल २०२४ । सध्या जून ते सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, यंदा खरिप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा दावा असून जर तुम्हीही यंदा सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर आज आपण सोयाबीनच्या लोकप्रिय वाणांबद्दल जाणून घेणार आहोत. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये या वाणांच्या सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. अनेकांनी या जातीच्या लागवडीला पसंती दर्शवली आहे. अशा परिस्थितीत या वाणांची विशेषतः समजून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

३ लाख शेतकरी दूध अनुदानास पात्र; २१६ कोटींची रक्कम वितरित!

१. ग्रीन गोल्ड ३४४४ वाण : ग्रीन गोल्ड ३४४४ हे सोयाबीन वाण ९५ ते १०० दिवसांच्या कालावधीत परिपक्व होते. या जातीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा होते. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाने, सदर जातीच्या सोयाबीनला लांबट/लहान आकाराची पाने असल्याने खोडापर्यंत सुर्यप्रकाश मिळतो, हेच कारण आहे की या जातीला मुबलक प्रमाणात फुलधारणा होते. किमान ६०% शेंगा ४ दाणे असतात. पाणी साचलेल्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनचे हे वाण तग धरून राहते. या कारणामुळे अतिवृष्टी होत असलेल्या भागात याची लागवड केली तरीदेखील शेतकऱ्यांना चांगल्यापैकी उत्पादन मिळण्याची शक्यता असते.

२. केडीएस ९९२ : या जातीला फुले दूर्वा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ केलेला हा सोयाबीनचा एक उत्कृष्ट वाण आहे. या जातीचे पीक सरासरी १०० ते १०५ दिवसात परिपक्व होते. सदर जातीला जास्तीत जास्त फांद्या लागतात. विविध कीटकांना आणि रोगांना ही जात कमी प्रमाणात बळी पडते. या जातीचे दाणे टपोरे आणि वजनदार असतात. जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करण्याच्या तयारीत असाल तर या जातीची तुम्ही निवड करायला पाहिजे.

paid add

कापूस निर्यातीमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ; हंगामातील दर घसरणीचा परिणाम!

३. एमएयुएस ६१२ : या जातीचे सोयाबीन पीक अंदाजी १०० दिवसात काढणीसाठी तयार होते. हा वाण प्रतीकुल वातावरणात देखील तग धरुन राहतो. उदा. अतीव्रुष्टी/कमी पाऊस ई. परिस्थितीमध्ये या जातीच्या सोयाबीन पिकातून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीचे पीक उंच वाढते. जेव्हा पीक हार्वेस्टिंग साठी तयार होते तेव्हा शेंगा तडकत नाहीत. यामुळे नुकसान कमी होते. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी अनुकूल असल्याचे आढळून आले आहे.

४. केडीएस ७२६ : केडीएस ७२६ अर्थातच फुले संगम ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. या जातीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे. याचा पीक परिपक्व कालावधी हा किमान १०५ ते ११० दिवस एवढा आहे. सदर जातीच्या सोयाबीनचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. टोकन पद्धतीने लागवड करायची असली तर हा वाण उत्कृष्ट ठरतो. मात्र येलो मोजक आणि किडींना लवकर बळी पडतो. यामुळे या जातीची लागवड करायची झाल्यास योग्य पद्धतीने नियोजन करणे अगदी आवश्यक आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम