शेतकऱ्यांवर धोक्याची घंटा : जयंत पाटलांची सरकारवर टीका !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २२ सप्टेंबर २०२३

राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर एकना अनेक संकट येत असतांना शेतकरी या संकटातून कसाबसा सावरत आहे. तर राज्यात गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश असल्याचे पाटील म्हणाले. सरकारनं धोक्याची घंटा ओळखावी आणि शेतकऱ्यांना मदत करावी असेही ते म्हणाले. देश अमृतकाळ साजरा करत असताना शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पाटील म्हणाले.

paid add

शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश आहे अशी टीका त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र, अतिवृष्टीमुळं जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हे सरकारचे खरे अपयश असल्याचं जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात एक हजार 584 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 25 वर्षांतील ही सर्वाधिक संख्या असल्याचे जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारनं ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.सर्वत्र, गणेश आणि गौरी उत्सव सुरू आहे. अशात यवतमाळ जिल्ह्यात मात्र, गेल्या दोन दिवसात सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं जमीन खरडून गेली होती. शेतात घेतलेलं पीक हे निकामी होत असल्याचे पाहून पुढे जगावं कसं या विवंचनेतून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील नितीन भारत पाने (जामवाडी), प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अर्जुना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) या 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम