कापसाच्या दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ५ जानेवारी २०२३ । कापसाचे दर देशातील बाजारात आजही काही ठिकाणी वाढले होते. आज दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा पाहयाल मिळाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दर आज (Cotton futures) काहीसे वाढले होते.

देशातील बाजारात आज कापसाला सरासरी ८ हजार ३०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. कापसाचे भाव पुढील काही दिवस सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम