देशात खाद्यतेल आयात वाढले !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २२ नोव्हेबर २०२३

मागील दशकभरापासून देशातील विविध बाजारात तेलबियांचे कमी उत्पादन आणि वाढत्या खाद्यतेलाच्या मागणीचे गणित मोठ्या प्रमाणात बिघडले असून त्यातच आता मागील दहा वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत दीड पटीने तर खाद्यतेलाच्या आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मागील एका दशकभरात भारतातील खाद्यतेल आयातीत ५० लाख टनांची वाढ नोंदवली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, 2013-14 यावर्षी देशात एकूण 116 लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. जी 2022-23 या वर्षांमध्ये 165 लाख टन इतकी सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. प्रामुख्याने मागील दोन ते तीन वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी संपूर्ण दशकाचा विचार करता खाद्यतेल आयात दीड पटीने तर आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून नवीन खाद्यतेल वर्ष सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर 2023 रोजी संपलेल्या मागील खाद्यतेल वर्षाची ही आकडेवारी नुकतीच समोर आली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम