ज्वारी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी : प्रतिकिलो मिळाला इतका दर

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २३ नोव्हेबर २०२३

देशभरातील शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक फटका बसत असतो यामध्ये ऊस, ज्वारी, बाजरी, गहू आणि मका या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर दरवर्षी या पिकांचे दर बदलत असतात. एखादया वर्षी दर कमी मिळतात तर एखादया वर्षी जास्त मिळतात. अशातच आता ज्वारी उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ज्वारीचे दर वाढले आहेत. प्रतिकीलो ६० ते ६५ रुपायांचा दर ज्वारीला मिळत आहे. यंदा राज्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतीवर झाला आहे. कमी पावसामुळे ज्वारीचे उत्पादन घावर्षी कमी झाले आहे.

परिणामी बाजारात ज्वारी कमी येऊ लागली आहे. आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांन होत आहे, परंतु सर्वसामान्य ग्राहकांना याचा तोटा सहन करावा लागत आहे.यंदा पावसामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकासह सर्वत्र ज्वारीचे उत्पादन कमी झाले आहे. यंदा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून पहिल्यांदाच ज्वारीची आवक झाली असुन गव्हापेक्षा ज्वारीचे दर वाढले आहेत. सध्या ज्वारीला चांगला दर मिळत आहे. परंतु अलीकडे पारंपरिक पद्धतीने पेरली जाणारी ज्वारी आता पीक राहावे, या उद्देशाने पेरली जात असली तरी ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

नागरिक आता स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी खात आहे. साहजिकच ज्वारीची मागणी वाढु लागली आहे. पुर्वी रशिया, युक्रेन आणि आता इस्त्रायल-पॅलेस्टाइन युद्धाचा देखील ज्वारीच्या दरांवर परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी थेट ६० रुपयांवर गेली आहे. आरोग्यवर्धकतेमुळे ज्वारीला मागणी जास्त आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम