शेतकऱ्यांना होणार फायदा : सागरी मार्गाने होणार भाजीपाल्यांची निर्यात

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २३ नोव्हेबर २०२३

देशात उत्पादन झालेले अनेक भाज्यांसह आंबा, डाळिंब आणि फणस यांसारख्या फळांची जागतिक बाजारात मोठी मागणी असते, पण फळे आणि भाज्या नाशवंत स्वरूपाच्या असतात. त्या जास्त वेळ टिकत नाहीत. काही काळाने त्या खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मागील काही दिवसांपासून सरकार सागरी मार्गाने केळी, आंबा, डाळिंब आणि जॅकफ्रूट यांसारख्या विविध फळे आणि भाज्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोटोकॉल तयार करत होते.

बहुतांश वस्तू कमी प्रमाणात आणि विविध पिकण्याच्या कालावधीमुळे हवाई मार्गाने निर्यात करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना आता सागरी मार्गाने फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात करता येणार आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकार्‍यानी माहिती दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, “सध्या बहुतांश वस्तू कमी प्रमाणात आणि विविध पिकण्याच्या कालावधीमुळे हवाई मार्गाने निर्यात करण्यात येत असून लवकरच आता या वस्तू सागरी मार्गाने निर्यात केल्या जातील. यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या आणि फळे खराब होणार नाही. आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागणार नाही.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या फळे आणि भाज्यांच्या निर्यातीला चालना मिळेल. हवाई मालवाहतूक निर्यातीचा या वस्तूंच्या किंमतीच्या स्पर्धात्मकतेवर देखील चांगला परिणाम दिसून येईल. सागरी मार्गाने निर्यात केल्याने फळे आणि भाज्या खराब होणार नाहीत. शिवाय खर्च देखील कमी होईल. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम