कृषीसेवक | ४ सप्टेंबर २०२३ | देशभरातील करोडो शेतकऱ्यांना केंद्र सरकार मोठी मदत करीत असते. यामध्ये पीएम किसान योजनेचा देशभरातील अनेक लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. या योजनेत आतापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच देशभरातील शेतकऱ्यांना २००० रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला आहे. यामुळे आता 15 वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. आता १५व्या हप्त्याचे पैसे सरकारकडून शेतकर्यांना हस्तांतरित करावे लागतील, परंतु जर तुम्हाला १५ व्या हप्त्यात २००० रुपये हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला ३ गोष्टी कराव्या लागतील.
जर तुम्ही या 3 गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. पीएम किसान योजनेच्या १५व्या हप्त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर द्वारे अर्ज करू शकता.
तुम्ही पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून नोंदणी करू शकता. तुम्ही तुमच्या जमिनीची कागदपत्रे अपलोड करा. सक्रिय बँक खात्याशी तुमचा आधार लिंक करा. तुमचे ई-केवायसी पूर्ण करा. केंद्र सरकार नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हप्ता येण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे उरकून घ्या.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम