अखेर तिढा सुटला : कांदा लिलाव पूर्ववत

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३ ऑक्टोबर २०२३

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव मागील १३ दिवसांपासून बंद होते. मात्र त्यावर अखेर पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन तोडगा काढला आहे. त्यामुळे आजपासून दि.३ नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्ववत झाले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यापासून त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठका होत होत्या. पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र काल पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात भुसे यांनी व्यापाऱ्यांना एका महिन्यात तोडगा काढला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आजपासून कांदा लिलाव सुरळीत सुरु केले आहेत.

कांदा लिलाव सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान कांदा लिलाव सुरु झाले असल्याची माहिती अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नसल्याने मोजकीच कांद्याची आवक बाजारात होत आहे. गेल्या १३ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेऊन बंद पुकारलेला होता. या बंदमध्ये नेमकं साध्य काय केलं? असा सवाल उपस्थित होत असून याच समाधानकारक उत्तर व्यापाऱ्यांकडे नसल्याचे समोर येतं आहे. कांदा व्यापाऱ्यांनी केलेली शेतकऱ्यांची कोंडी आणि लिलाव बंद यावर तोडगा काढण्यासाठी सुरुवातीला व्यापाऱ्यांची बैठक, मंत्री मंडळाची बैठक, पालकमंत्र्यांची बैठक, शेतकऱ्यांची बैठक, त्यानंतर पुन्हा पालकमंत्र्यांची बैठक अशा सगळ्या घडामोडीनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरु झाले आहेत. मात्र या बंद दरम्यान जवळपास ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम