शिंदे गटाच्या आमदाराने केली शेतकारीला शिवीगाळ ? ऑडिओ क्लिप व्हायरल !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २० जानेवारी २०२३ ।  राज्यातील भाजपसह शिंदे गटातील अनेक नेते वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. आता पुन्हा शिंदे गटातील आमदार अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे. शिंदे गटाचे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये संजय गायकवाड एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे समोर आले आहे. ऑडिओ क्लिपनुसार उपसा जलसिंजन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत अनिल गंगितरे या शेतकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केला होता. बोदवड उपसा जलसिंजन कधी पूर्ण होणार?, असा सवाल या शेतकऱ्याने केला होता.

शेतकऱ्याच्या प्रश्नावर संजय गायकवाड चांगलेच वैतागले. त्यांनी प्रथम शेतकऱ्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड शेतकऱ्याला म्हणाले, बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 1100 कोटींचा निधीही मी मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे. मार्च महिन्यात योजनेचे काम सुरुही होईल. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका.
यावर शेतकऱ्याने आपण नौटंकी करत नसल्याचे सांगितले. तसेच, रखडलेले काम, निविदा याबाबत आपल्याला अधिकाऱ्यांनीच माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संतापाचा पारा आणखीच चढला आणि त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केली.

ऑडिओ क्लिप आपलीच – संजय गायकवाड
दरम्यान, या ऑडिओ क्लिपबाबत प्रसारमाध्यांना दिलेल्या प्रतिक्रियेत संजय गायकवाड यांनी ही ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण या योजनेबाबत नागरिकाशी अर्धा तास बोललो. मात्र, प्रसार माध्यमांत केवळ दोन मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, असेही संजय गायकवाड म्हणाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम