खान्देशात रब्बीची पेरणी जोरात सुरु

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी जलद होत असून कोरडवाहू हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. धुळे व नंदुरबारातील पेरणीदेखील बऱ्यापैकी आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार २१८ हेक्टरवर पेरा झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
बाजरी पेरणी जानेवारीत सुरू होईल. तसेच कांदा लागवडही झाली आहे. हे क्षेत्र लक्षात घेता पेरणी आणखी वाढेल, असे दिसत आहे. खानदेशात एकूण चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ९२ हजार हेक्टर आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात पेरणी सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली आहे. धुळ्यात सुमारे ३८ हजार हेक्टर एवढे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. पण तेथेही पेरणी ४० हजार हेक्टरवर होईल.
नंदुरबार जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टर आहे. तेथेही पेरणी ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक होऊ शकते. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर ही पेरणी झाली आहे. त्यात कोरडवाहू हरभरा पेरणी पूर्ण झाल्याची माहिती आहे. या जिल्ह्यात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांवर जाईल.

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम