कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | अमेरिकेला भारतातून साडे आठ हजार टन साखर निर्यात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण ही निर्यात दोन देशांतील मैत्रीपूर्ण कराराचा एक भाग आहे. त्यामुळे अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढण्याची शक्यता नाही.
कारण अमेरिकेच्या शेजारी ब्राझील आहे. ब्राझील हा जगात सगळ्यात जास्त साखर निर्यात करतो. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. ब्राझीलच्या तुलनेत भारतातून साखर आयात करणे अमेरिकेला परवडत नाही. ती खूप महाग पडते. त्यामुळे साडे आठ हजार टनाची निर्यात हा केवळ सदिच्छेचा भाग आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं. अमेरिका हा काही आपला प्रमुख आयातदार देश नाही. आपली साखर बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या आशियायी देशांमध्ये जाते. तसेच आखाती देशदेखील मोठ्या प्रमाणात भारतीय साखर विकत घेतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम