देशात कापसाचे भाव कमाल ९ हजारापर्यंत पोहचले

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ६ जानेवारी २०२३ । देशातील काही बाजारांमध्ये आज कापसाचे कमाल जर ९ हजार रुपयांपर्यंत पोचले. कर्नाटक आणि गुजरातमधील बाजारांत हा दर मिळाला.

तर देशातील सरासरी दरपातळी आता ८ हजार ४०० ते ९ हजार रुपयांपर्यंत पोचली आहे. बाजारातील आवक स्थिर होती. आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापसाचे दर घटले होते. आज कापसाच्या दरात काहीशी सुधारणा झाली.

मात्र ती मर्यादीत राहिली. देशातील बाजारात कापसाचे दर सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये राहू शकतात, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असा जाणकारांचा सल्ला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम